Advertisement
सोलापूर : होटगी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या नवीन शालेय इमारतीचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी माजी मंत्री ढोबळे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. शाळेने शैक्षणिक दृष्टीने केलेल्या विकासात्मक कामाची पाहणी देखील विखे पाटील आणि ढोबळे यांनी केली.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनिषा आव्हाळे इतर आदी उपस्थित होते.
