Advertisement
नाशिक : शोषित, पीडित, वंचितांची लढाई लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर सुडाने, आणि नियोजित पद्धतीने हल्ले होणार असतील तर मग आम्ही खरोखर स्वतंत्र आहोत का?? असा सवाल नाशिक शहर
बहुजन रयत परिषद वतीने कॉ. गणपत भिसे हल्ला प्रकरणी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आला. यावेळी दोषींवर कठोर कादेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यानी केली आहे.
बहुजन रयत परिषदेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील आमचे सहकारी कॉ. गणपत भिसे यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाही नीती मूल्यांना मारक असून सदर घटनेची शासन आणि प्रशासनाने दखल घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई होऊन कठोर शासन व्हावे.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष अंबादास आहिरे, सूर्यकांत भालेराव, साहेबराव शृंगार, धनंजय जाधव,अशोक साठे,दिनकर लांडगे,के.एफ.कांबळे,प्रकाश पवार,रवी जगताप,नाना खंडाळे,रवींद्र पाटील,राजू थोरात,ज्ञानेश्वर जाधव, दिलीप नेटारे,दिलीप खरात ,युवराज आहिरे या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
