#

Advertisement

Friday, March 3, 2023, March 03, 2023 WIB
Last Updated 2023-03-07T11:15:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिंदे फडणवीस सरकारला औरंगाबाद खंडपीठाचा दणका

Advertisement

औरंगाबाद : 'तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने घेतलेले शेकडो निर्णय रद्द करणे किंवा त्यांना स्थगिती देणे, ही नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारची भूमिका व कृती निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. आधीच्या सरकारचे असे अनेक निर्णय हे अंमलबजावणीच्या प्रक्रियेत होते किंवा अंशतः अंमलबजावणी झालेले होते. अशा निर्णयांना व विकासकामांना स्थगिती देणे हे घटनाबाह्य आणि मनमानी स्वरूपाचे आहे', असा आरोप करत शिंदे सरकारच्या निर्णयाला याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणात शिंदे फडणवीस सरकारला औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना आदेश दिल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी विविध विभागांच्या प्रधान सचिवांना 20 जुलै रोजी निर्देश दिले. त्यानंतर त्या-त्या विभागांच्या प्रधान सचिवांनी अनेक निर्णयांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली किंवा अंमलबजावणी रद्द केली. त्यात काही नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या. वास्तविक आधीच्या सरकारने कायदेशीर व वैधानिक तरतुदींचे उल्लंघन करून काही निर्णय घेत असले, ते अतार्किक असले किंवा जनहितविरोधी असले तरच ते रद्द करणे किंवा स्थगित करता येऊ शकतो. परंतु, या प्रकारात कोणतेही वाजवी व सबळ कारण नसताना निव्वळ राजकीय हेतूने निर्णय घेऊन आधीच्या सरकारचे अनेक निर्णय रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत.
याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. यावर रद्द केलेली काम करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. जालना आणि परभणी जिल्ह्याच्या चार तालुक्यातून याचिका दाखल झाली होती.