#

Advertisement

Friday, March 10, 2023, March 10, 2023 WIB
Last Updated 2023-03-10T17:36:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली "लेक लाडकी'योजना महत्त्वपूर्ण

Advertisement


बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मानले आभार

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष घोषणांची तरतूद करण्यात आली. महिला सक्षमीकरण, विकास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची पाऊले उचलल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसत असताना महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महिलाशक्तीला सलाम करीत राज्य शासनाने "लेक लाडकी' योजनेची तरतूद अर्थसंकल्पातून केली आहे. मुलींच्या भविष्याच्यादृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने यानिर्णयाबाबत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार मानते, अशा शब्दांत बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी या योजनेचे तसेच अर्थसंकल्पचे स्वागत केले.
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी राज्य शासनाच्या सदर योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करताना सदर योजनेचा समावेश केला आहे. 'लेक लाडकी' ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर शासनाकडून 5000 रुपये जमा केले जाणार आहेत, त्यानंतर चौथीत असताना 4000, सहावीत असताना 6000 आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8000 रुपये जमा केले जाणार आहेत. लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख मिळणार आहे. यातून मुलीच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि इतर खर्च करणे आर्थिकदृष्ट्या सुलभ होईल. याच कारणातून ही योजना महत्त्वपूर्ण वाटते. विशेषत: अनुसुचित जाती-जमातीमधील मुलींना याचा अधिक लाभ होईल, सामान्य गरीब कुटुंबातील मुलींना यातून शिक्षणाचा भक्कम आधार मिळेल, त्यामुळे सदर योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते.