#

Advertisement

Tuesday, March 14, 2023, March 14, 2023 WIB
Last Updated 2023-03-14T10:44:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, जोरदार खडाजंगी

Advertisement

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विधानभवनाच्या बाहेरच दोन्ही नेते आमने-सामने आले होते. यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोघांनीही लव्ह जिहादवरुन एकमेकांना खडे बोल सुनावले.
विधानभनबाहेर प्रसारमाध्यमांसोर बोलताना नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारलं जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे असं मत मांडलं. त्यावर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच दिलं. त्यावर अबू आझमी यांनीही हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो. पण हे खोटं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे असं म्हटलं. त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. पाहिल्यानंतर तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, हे माझं तुम्हाला आव्हान आहे असं नितेश राणे म्हणाले. तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असं नितेश राणे म्हणाले. त्यावर अबू आझमी यांनी मी तुम्हाला खोटं आहे सांगायला 50 ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं.