#

Advertisement

Tuesday, March 14, 2023, March 14, 2023 WIB
Last Updated 2023-03-14T10:50:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद

Advertisement

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात संपामुळे काही शाळा बंद ठेऊन मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही शाळा सकाळी भरल्या पण तिथे शिक्षकच आलेले नाहीत. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम मुंबईत रूग्णसेवेवर होताना दिसत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी , आज राज्य सरकारी कर्मचारी आंदोलन पुकारले आहेत, कोकण भवन मधील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात  सहभाग घेत , जुनी पेन्शन लागू  करण्यासाठी घोषणाबाजी केली, तसेच आमदारांना पेन्शन लागू केले आहे मग कर्मचाऱ्यांना का नाही अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.