#

Advertisement

Tuesday, March 7, 2023, March 07, 2023 WIB
Last Updated 2023-03-07T17:18:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर ?

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत, पण आता पुन्हा एकदा राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर आलं आहे, याला कारण ठरतंय भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला घातलेली साद. होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधानं केली आहेत. राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी धुळवडीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे. एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता सर्व वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. वर्षाचे 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. 365 दिवस शिमगा साजरा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा, असा टोला फडणवीसांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे.