#

Advertisement

Friday, March 3, 2023, March 03, 2023 WIB
Last Updated 2023-03-03T15:42:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत निवडणूक आयोगावर घसरले

Advertisement

सांगली : शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली आहे. थेट निवडणूक आयोगाचा बाप काढत राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिवी दिली. तसेच शिवसेना ही निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा संतप्त सवाल करत आपल्या असंसदीय शब्द जरी असले तर तो आपला संताप आहे, असं स्पष्ट केलं. 
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिकांचा मेळावा आज सांगलीमध्ये पार पडला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. ही टीका करताना राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिव्या घातल्या आहेत. ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी निवडून दिलं ते आज इथेच आहेत. 50 खोके घेऊन पळून गेले आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची. शिवसेना तुझ्या बापाची आहे का? असा प्रश्न विचारत राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. शिवसेना ही काय निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. 50-55 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, असेही राऊत म्हणाले.