Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच अनिक्षा जयसिंघानियाच्या इतक्या दिवस संपर्कात होते ते कसं चाललं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. माझ्या मागे एसआटी लावली, सरकारकडून विरोधकांना छळण्याचं काम सुरू असल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. माझ्या मागे एसआटी लावली, माझ्यावर जेवढ्या काही केस दाखल आहेत त्या सर्व खोट्या आहेत. माझं नाव घेण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. मला रात्रभर आंदोलन करावं लागलं, पण अजूनही गुन्हा नोंदवला नाही. राज्यात विरोधकांना छळण्याचं काम सुरू आहे. एक जण बोलला की खडसे कुटुंबावर गुन्हे दाखल होणार आहेत, हे राज्यात काय सुरू आहे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच काही लोक म्हणतात तुम्ही देशद्रोह्यांसोबत बसता, असं कोणी कसं म्हणून शकतं? मग अनिक्षा जयसिंघानियाच्या इतक्या दिवस संपर्कात होते ते कसं चाललं असं म्हणत खडसे यांनी फडणवीसांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
