#

Advertisement

Saturday, March 25, 2023, March 25, 2023 WIB
Last Updated 2023-03-25T16:29:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिवसेना खासदाराला जीवे मारण्याची धमकी

Advertisement

परभणी :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीनं खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी  देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात  आली होती. 
दरम्यान , राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना देखील धमकी देण्यात आली होती.  नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश पुजारी या व्यक्तीच्या नावाने धमक्या आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.