#

Advertisement

Friday, March 3, 2023, March 03, 2023 WIB
Last Updated 2023-03-03T11:52:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

चिंचवडचे गेम चेंजर कलाटेंच्या मागे कोण?

Advertisement

मुंबई : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळाला. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा या निवडणुकीत विजय झाला. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव केला, पण भाजपच्या या विजयात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे गेमचेंजर ठरले. राहुल कलाटे यांनी चिंचवडमध्ये 44 हजारांपेक्षा जास्तचं मताधिक्य घेतलं.
राहुल कलाटेंमुळे चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाल्याचं अजित पवारांसह महाविकासआघाडीचे नेते म्हणाले. महाविकासआघाडीच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. राहुल कलाटे उभे राहिल्यामुळे भाजपचा विजय झाला, असा भ्रम काही जण पसरवत आहेत, पण हे सत्य नाही. 2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं केलं, पण ते 38 हजारांच्या फरकाने हरले. त्यावेळी हा प्रयोग का झाला होता? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उभं केलं तर जी शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं आहेत ही सरळ भाजपकडे जातील, म्हणून त्यांना अपक्ष उभं केलं होतं', असं फडणवीस म्हणाले.