#

Advertisement

Friday, March 31, 2023, March 31, 2023 WIB
Last Updated 2023-03-31T16:41:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

प्रणिती शिंदेंनी राज ठाकरेंना डिवचलं

Advertisement

पिंपरी चिंचवड : 'जो गरजते है बरसते नही' राज ठाकरे भाजपची B टीम आहे. त्यांना सोबत घेऊन राज्यात दंगली घडविण्याचे भाजपचा प्रयत्न आहे, असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या समर्थनार्थ आज स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली. पिंपरी चिंचवडमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'जो गरजते है ओ बरसते नही. राज ठाकरे भाजपची B टीम आहे. त्यांना सोबत घेऊन राज्यात दंगली घडविण्याचे भाजपचा प्रयत्न आहे, अशी खोचक टीका करत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांना अटक केली गेली तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार असल्याचंही शिंदे म्हणाल्या तर, शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत राहुल गांधी सकारात्मक विचार करतील मात्र सावरकरांबाबत काँग्रेसची भूमिका बदलणार नाही, असं प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला.