#

Advertisement

Friday, March 31, 2023, March 31, 2023 WIB
Last Updated 2023-03-31T17:45:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कॉंग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचे निधन

Advertisement

सोलापूर : कॉंग्रेस पक्षाचे माजी खासदार संदीपान थोरात यांचे आज उपचारादरम्यान सोलापुरात निधन झाले. थोरात हे पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आले होते. थोरात यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सखुबाई थोरात, चार मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.
सोलापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून संदीपान थोरात यांच्यावर उपचार सुरू होते. संदीपान थोरात हे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. माजी खासदार संदिपान थोरात हे 1977 ते 1999 या कालावधीत पंढरपूरचे सलग सात वेळा खासदार होते. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ म्हणून थोरात प्रचलित होते.
पंढरपूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला करण्यात थोरात यांचा स्वभाव आणि त्यांचे राजकारण महत्वाचे मानले जाते. पंढरपुरात सात वेळा निवडून आलेले संदीपान थोरात हे अखेरपर्यंत गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहिले.