Advertisement
उमरगा : बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक दिलीपराव गायकवाड, राजाभाऊ शिंदे, दलित महासंघ तालुका अध्यक्ष सुखदेव होळीकर, अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे सचिव दीपक पात्रे, कोंडीबा कोल्हे, गोजराबाई बनसोडे, रूपाली रणदिवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
