#

Advertisement

Tuesday, March 14, 2023, March 14, 2023 WIB
Last Updated 2023-03-14T10:30:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

हसन मुश्रीफांना दिलासा, अटक टळली

Advertisement

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पण, आधीच मुश्रीफ यांना दिलासा दिला आहे, मग कारवाई कशाला करता? असा सवाल करत मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला फटकारून काढलं आहे. तसंच, 2 आठवडे कारवाई न करण्याचे निर्देशही ईडीला दिले आहे.
हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज पुन्हा एकदा मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मूळ प्रकरणांत दिलासा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली. आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रिफांनी माहिती दिली. 
या प्रकरणात ईडीचा तपास ज्या मुळ केसवर अवलंबून आहे, त्यात जर आरोपीला दिलासा दिलेला आहे, तर मग यात ईडी कारवाई कशी करू शकते ? असा सवाल मुंबई हायकोर्टाने ईडीला केला. यावर ईडीकडून अनिल सिंह म्हणाले की, ईडीला आर्थिक अनियमितता असलेल्या प्रकरणांत तपास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ईडीचं प्रकरण आणि तपास हा मूळ तपासापेक्षा वेगळा असतो.