Advertisement
पुण्यात भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला कसबा महाविकासआघाडीने धंगेकरांच्या रूपाने काबिज केल्याने महाविकासआघाडीच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या आहेत. भाजपविरोधात आपण एकदिलाने लढलो तर नक्कीच जिंकू शकतो, हा दांडगा आत्मविश्वास महाविकासआघाडीच्या नेत्यांना आत्तापासूनच वाटू लागला आहे. गेल्यावेळी अवघ्या पाच हजाराने पराभूत झालेले काँग्रेसचे माजी मंत्री पुणे कॅटोन्मेंट मतदारसंघातून आत्तापासूनच कामाला लागले आहेत. शिवाजीनगर आणि कॅन्टोंमेंटची जागा 2024 ला आम्ही जिंकणारच, असा दावा ते आत्तापासूनच करू लागले आहेत. कारण या दोन्ही जागा काँग्रेसनं गेल्यावेळी अवघ्या 5 हजार मतांच्या फरकाने हरल्या होत्या.
2019 ला राष्ट्रवादीची खडकवाल्याची जागा तर अवघ्या 2595 मतांनी हरली, त्यामुळे यावेळी ही जागा आम्ही काहीकेल्या जिंकणारच कारण दोन्ही काँग्रेससोबत शिवसेनेची मतंही यावेळी महाविकासआघाडीमध्ये ऍड झाली आहेत, तसंच वंचितही सेनेसोबत आहे, म्हणूनच 2024 साली पुण्यात भाजपसाठी अतिशय निराशाजनक चित्र असेल, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आत्तापासूनच ठामपणे सांगत आहेत.
