#

Advertisement

Thursday, April 27, 2023, April 27, 2023 WIB
Last Updated 2023-04-27T11:25:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

शिर्डीत 1 मे रोजी 'शिर्डी बंद' ची हाक

Advertisement

शिर्डी :  1 मे रोजी शिर्डीतील ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा पवित्रा घेतला आहे. शिर्डीच्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. साईबाबा मंदिरातील सुरक्षा व्यवस्था साई संस्थान कर्मचारी करतात तर मंदिर परिसराच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिसांची कुमक नेमण्यात आली आहे. याचबरोबरीने दररोज बॉम्ब शोधक पथकाडून मंदिराची तपासणी केली जाते. 
सुरक्षेबाबत ही काळजी घेतली जात अससतानाच CISF ची सुरक्षा साईबाबा मंदिराला असावी अशी चर्चा होत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. साई मंदिराला CISF ची सुरक्षा लागू होणार याच कारणामुळे शिर्डीत 1 मे रोजी 'शिर्डी बंद' ची हाक देण्यात आली आहे. 

1 मे रोजी शिर्डीत काय सुरु काय बंद? 
1 मे रोजी शिर्डीत साईबाबा मंदिर भाविकांनासाठी खुले राहणार आहे. साईबाबा संस्थानचे सर्व भक्त निवासही यावेळी सुरू राहतील. साईबाबा प्रसादलय, भोजनालयही सुरू असेल. तसेच साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी सुरू राहणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी गेस्ट हाऊस, लॉजिंग सुरू ठेवणार. पण, शिर्डीतील इतर व्यवसाय मात्र पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार आहे.