#

Advertisement

Thursday, April 27, 2023, April 27, 2023 WIB
Last Updated 2023-04-28T04:42:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

कोमलताई यांच्या मागे सरपंच, उपसरपंचांची मोठी ताकद...

Advertisement

 


रहाटेवाडी येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार समारंभात स्पष्ट 

रहाटेवाडी : बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांची एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण झाल्याचे तसेच त्यांचा तळागाळातील दांडगा संपर्क मोठा असल्याचे रहाटेवाडी येथील कार्यक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. रहाटेवाडी येथे नवनिर्वाचित सरपंच श्री लक्ष्मण दसाडे, उपसरपंच श्री नवनाथ पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री प्रदीप पवार, श्री महावीर सोनवणे, सौ. अश्विनी पाटील, सौ शकुंतला पवार, श्री गोकुळ पाटील सर्वांचा सत्कार माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे सर ॲड. कोमलताई साळुंखे- ढोबळे प्रदेशाध्यक्ष बहुजन रयत परिषद महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांचा सत्कार जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ढोबळे यांनी ग्रामस्थांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्या एकजुटीने मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन दिले तसेच ॲड. कोमलताई साळुंखे- ढोबळे यांचा सत्कार सौ. सविता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी महिला वर्गांना बचत गटाबद्दल व महिलांकरिता असणाऱ्या योजनांची माहिती सविस्तर दिली, त्यावेळी ग्रामसेवक श्री.मुलानी, श्री.जगदीश पाटील, श्री.ज्ञानेश्वर पवार, श्री. नितीन पाटील, श्री. जगन्नाथ पवार, श्री. दत्तात्रय पाटील संपर्कप्रमुख बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य ,सौ. कल्पना दत्तात्रय पाटील, श्री. आनंदराव बनसोडे.सौ. शितल आनंदराव बनसोडे, श्री. विशाल खंदारे,कु.निशा-पुणे ,श्री. समाधान वाघमारे, श्री. बाळू मुलानी,श्री. रेवाप्पा दसाडे, श्री. बसवराज गडदे, श्री. दसाडे परिवार, सौ. सविता पाटील -उपसंचालिका श्री दामाजी साखर कारखाना, सौ. आशा पवार ,सौ. सिंधू पवार, सौ. पल्लवी पाटील, सौ. निर्मला पाटील, सौ. सुमित्रा पाटील, सौ. महानंदा पाटील, सौ.ममता सोनवणे ,सौ.विजया पाटील, सौ. रोहिणी पाटील, सौ. कांताबाई दसाडे, सौ.नर्मदा दसाडे, सौ. शालन पवार, सौ.शोभा पाटील, सौ.कौशल्या पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पवार यांनी केले.