#

Advertisement

Tuesday, April 11, 2023, April 11, 2023 WIB
Last Updated 2023-04-11T11:34:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

चंद्रकांत पाटील यांच्या याविधानामुळे वाद पेटला

Advertisement



मुंबई : बाबरी पाडण्यात आली तेव्हा तिथे शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याविधानामुळे वाद पेटला आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
'चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहे आणि आमचे सहकारी आहेत. पण त्यांच्या वक्तव्यांनी आम्ही सहमत नाही. वंदनीय बाळासाहेब तिथे नव्हते हे सांगणे योग्य नाही. चंद्रकांत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.
बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला, तेव्हा शिवसैनिक तिथे होते. त्यावेळी बाळासाहेब, अडवाणींजी यांच्यावर गुन्हे झाले आहे. सर्वात आधी समर्थन करणारे बाळासाहेब ठाकरे हेच होते. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. ९३ ची दंगल झाली ती बाळासाहेब यांच्यामुळे आटोक्यात आली. बाळासाहेब म्हणाले होते की, माझ्या शिवसैनिक यांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.