Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसभोवती संशयाचे ढग दाटलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले नाहीत, त्यामुळे फडणवीस नेमके कुठे आहेत? याबाबतही चर्चा झाल्या. 15 एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यानंतर ते जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलले, पण मीडियासमोर आले नव्हते. आता देवेंद्र फडणवीस मुंबईत मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली.
शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे, त्याकरता सोलरायजेशन करण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतला आहे. सोलारची वीज दिवसा तर मिळेलच, पण ही वीज 3 रुपये ते 3 रुपये 30 पैशांपर्यंत आपल्याला मिळणार आहे. आपण जी सबसिडी देतोय त्यात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. कोळसा वापरून वीज निर्मितीमध्ये जी पर्यावरणाची हानी होत आहे, तेदेखील होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
