Advertisement
नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा चौदावर गेला आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून श्रीसदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. भर उन्हात लाखोंची गर्दी जमली होती. पण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना उन्हाचा त्रास झाला. दुर्देवी उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला. काही जण रात्रीपासूनच तर काही जणं पहाटेपासून या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत जमले होते.
आज आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू : या दुर्घटनेत आज आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. विरारमध्ये राहाणाऱ्या स्वाती वैद्य असं मृत महिलेचं नाव असून त्या 34 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर वाशीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज त्यांचा मृत्यू झाला. भर उन्हात कार्यक्रम झाल्यानंतर अनेक सदस्यांना चक्कर येणे, उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. अनेकांना वाशीतल्या एमजीएम रुग्णालय, नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय, नेरुळ इथलं डी वाय पाटील रुग्णालय तसेृंच खारघरमधल्या टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
