#

Advertisement

Wednesday, April 19, 2023, April 19, 2023 WIB
Last Updated 2023-04-19T12:00:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

चीनला टाकलं मागे.., भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

Advertisement

नवी दिल्ली : भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या डेटामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये असे दिसून येते की भारताने चीनला मागे टाकून 142.86 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. UNFPA नुसार चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. UNFPA च्या 'द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023' हा अहवाल प्रसिद्ध केला. ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स एंड चॉइस’ असे या अहवालाचे शिर्षक आहे.
अहवालातील ताजी आकडेवारी 'डेमोग्राफिक इंडिकेटर्स' या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे. 1950 पासून जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी लोकसंख्येचा डेटा गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे सुरू केले तेव्हापासून भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. UNFPA च्या मीडिया सल्लागार अण्णा जेफरीज म्हणाल्या, 'हो, भारताने चीनला कधी मागे टाकले हे स्पष्ट नाही.'