Advertisement
सांगली : राज्यात सध्या मुख्यमंत्री पदाबाबत चढाओढ सुरू आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हास्यास्पद आहे. पण, मुख्यमंत्रीपदासाठी आपणही इच्छूक आहोत. जर भविष्यात दलित मुख्यमंत्र्यांचा विचार झाल्यास आपल्या संधी द्यावी,.अस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आठवले यांनी म्हटलं आहे की, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. अजितदादांना तिकडे मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल असं वाटत नाही. आम्हाला अजित पवारांची गरज नाही. शरद पवार यांनी एनडीएसोबत यायला पाहिजे. मी आलो आहे तर पवार यांना यायला काय हरकत आहे. शरद पवार यांनी आता ठोस निर्णय घ्यावा, ज्यांना जायचे त्यांना असं म्हणण्यापेक्षा शरद पवारांनीच आता एनडीएमध्ये यावं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
