#

Advertisement

Monday, April 3, 2023, April 03, 2023 WIB
Last Updated 2023-04-03T09:48:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सांगली पालिकेत आयुक्तांना फेकून मारला बूट

Advertisement

सांगली : महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यावर एका व्यक्तीकडून बूट फेकून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या कैलास काळे नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत सांगली महापालिकेसमोर निदर्शनं केली आहेत. आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत ही सुनावणी यावेळी कैलास काळे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्र बाबतीत असणाऱ्या त्याची तक्रार आयुक्त सुनील पवार यांच्यासमोर सादर केली. पण कायदेशीर दृष्ट्या आयुक्तांनी सदरची तक्रार मान्य करण्यात येत नसल्याचे सांगितलं. याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्यास सांगितलं.
यानंतर कैलास काळे यांनी रागाच्या भरात आयुक्त सुनील पवार यांना शिवीगाळ करत, त्यांच्या अंगावर आपल्या पायातला बूट फेकून मारला. या घटनेनंतर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कैलास काळे याला ताब्यात घेतलं आणि सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तर काळे यांची तक्रार आणि मागणी आपल्या अखत्यारीत येत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. असं आयुक्त सुनील पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आयुक्त पवार यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर सांगली महापालिका क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत सांगली महापालिका कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन सुरू केला आहे. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई, करावी अन्यथा काम बंद सुरूच राहिल असा इशारा दिला आहे.