#

Advertisement

Monday, April 24, 2023, April 24, 2023 WIB
Last Updated 2023-04-24T12:24:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'मविआ आज आहे उद्याच सांगता येत नाही',.., चुकीचा अर्थ काढला गेला

Advertisement

मुंबई  : 'मविआ आज आहे उद्याच सांगता येत नाही' असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, अखेरीस शरद पवारांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार यांनी अमरावतीमध्ये महाविकास आघाडी पुढे राहील की नाही माहिती नाही, असं विधान केले त्यानंतर वेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेरीस या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
'महाविकास विकास आघाडी विषयी जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. जागा वाटपची चर्चा झाली नाही, तर मी कसं सांगू की महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही. जागावाटप नंतरच कळेल की कोण किती जागा लढवत आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. महाविकास आघाडी ऐक्य राहवी ही भूमिका आहे पण जागा वाटप काहीच चर्चा नाही याचा संदर्भ देत विधान केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं.