Advertisement
पुणे : मी ही मुख्यमंत्री बदलाची चर्चा ऐकतो आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल, अजून कोर्टाचा निर्णय बाकी आहे. कोर्टाचा निर्णय लागल्यावर काय होईल ते बघू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी ते राज ठाकरे यांच्यावरही बोलले आहेत, जसं राज ठाकरे यांनी काकाकडे लक्ष ठेवलं, तसंच मीही काकाकडे लक्ष ठेवतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबईमधील एका कार्यक्रमात तव्यावरची भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, विलंब करून चालणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं, त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात नवीन चेहेर असले पाहिजेत, तरुणांना संधी मिळाली पाहिजे या हेतूनं पवार साहेब बोलले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
