#

Advertisement

Thursday, April 27, 2023, April 27, 2023 WIB
Last Updated 2023-04-27T10:34:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीत मोठ्या बदलाचे संकेत

Advertisement


शरद पवारांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई : भाकरी फिरवण्याची वेळ आता आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही,  असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पवार बोलत होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यामधून राष्ट्रवादीमध्ये पुढील काळात मोठ्या बदलाचे संकेत दिसून येत आहेत. 
शरद पवार यांनी हे वक्तव्य मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित युवा मंथन कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे पवारांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल पहायला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पवार यांचा या वक्तव्यामागे आणखी काही उद्देश आहे का?  याची देकील जोरदार चर्चा सुरू आहे.