Advertisement
पुणे : महाराष्ट्रात कोणतेही राजकीय बदल सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर होऊ शकतात, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्यांचा केसचा निकाल सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या केसची सुनावणी कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यावर आत्ताच बोलणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव आणल्यासारखे होईल. मात्र, राजकीय अनिश्चितमुळे लोकशाही व्यवस्थेचे भुसभुशीकरण झाल्याचे दिसत आहे .कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असणे दुःखदायक आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे शरद पवार, संजय राऊत हे शिल्पकार असून त्याचे सारथ्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे .परिस्थितीनुसार आघाडी होतात व परिस्थितीनुसार त्या बदलतात आणि नवीन आघाड्या तयार होतात. त्यामुळे स्वतःची दिशा बदलण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण झाल्याचे पहावयास मिळते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी भाष्य करणार नाही.
