#

Advertisement

Monday, April 3, 2023, April 03, 2023 WIB
Last Updated 2023-04-03T17:00:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

स्वाभिमान तुमच्यात असता तर राहुल गांधींच्या फोटोला चपला...!

Advertisement

मुंबई : जे लोक स्वातंत्र्यवीरांना माफीविर म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मित्र पक्षाने सावरकर समलैंगिक होते असे मुखपृष्ठ काढले. तुमच्यामध्ये स्वाभिमान असेल तर कृतीत दिसला पाहिजे. खरा स्वाभिमान तुमच्या कृतीत असता तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचे काम तुम्ही केले असते. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही राहुल गांधी यांच्या फोटोला चपला मारण्याचे काम आम्ही केले. हे विसरले आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो. यांच्यात हिंमत नाही मग बातम्या सोडतात पवार साहेब राहुल गांधी म्हणाले की, सावरकर यांच्याबद्दल बोलू नका. हे जेवढे वेळा सावरकर यांचा अपमान करतील तेवढी लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
राज्यातील अनेक शहरात गौरव यात्रा काढण्यात येत आहे. आज कांदिवली येथील सावरकर गौरव यात्रेत देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेतील सभेला संबोधित केलं. 
जे सावरकरांना माफीवीर म्हणतात त्यांच्यासाठी आम्हाला यात्रा काढावी लागते. राहुल गांधी तुम्ही कधी सावरकर होऊ शकत नाही. तुमची औकात नाही सावरकर होण्याची अशी टीका फडणवीस यांनी केली. तुम्ही सावरकर ही नाही आणि तुम्ही गांधी ही नाही. फिरोज गांधी तुमचे आजोबा यांनी संसदेत सावरकर यांच्या अभिनंदन प्रस्तावाला सर्मथन दिल होतं. राहुल गांधी तुमच्या आजोबांनी काय केलं हे देखील तुम्हाला माहिती नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींपासून यशवंतराव चव्हाण यांनी सावरकरांचा गौरव केला. खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी सावरकर यांचा अपमान सहन करता कामा नये. मला एक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दाखवा, ज्यावेळी राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. अलिकडे बाजार बुनगे सुद्धा मोदींवर बोलत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सावरकर यांनी लिहिली. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते सावरकर यांना माफीवीर म्हणतात. अरे लाजा धरा. तुमच्यावर टीका करण्याची माझी इच्छा नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.