#

Advertisement

Monday, April 3, 2023, April 03, 2023 WIB
Last Updated 2023-04-03T18:02:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

संदिपान.., आम्ही तुमचे कायम ऋणी राहू : प्रा. लक्ष्मण ढोबळे

Advertisement

लक्षवेधी प्रतिनिधी

सोलापूर : साधा सरपंच झाला तर सरपंचाची माडी म्हणून गावात ओळख असते. नगरसेवक झाला तर सातपिढ्यांची ओळख मजबूत होते. परंतु, सात वेळा खासदार झाल्यावरही, खासदार संदिपान थोरात पत्र्याच्या घरात राहीले. सात मुलाचा संसार, हाउसिंग सोसायटी, माढ्याच्या वावरात माढेश्वरी बॅंकेपासून, जगदंबा सुतगिरणी पर्यंत पुजारी म्हणून राहिले. पण, घरावरची पत्रे बदलता आली नाहीत. बुधवार पेठ, शोभानगर, हाउसिंग सोसायटी, भरगच्च पस्तीस वर्षाचा राजकीय संसार मांडला. किती वेळा तरी मोडला, तरी खासदाराने जिद्दीने समाज उभा केला. यामुळे जिल्ह्यावर अनंत उपकार आहेत. मिळालेले खासदारकीचे पेन्शन जमा केली असती तर 21 कोटीच्या घरात गेली असती. संदिपान भगवान थोरात यांचा जन्मदाता भगवान असूनही घरावरची पत्रे बदलता आले नाहीत. नाव संदिपान असूनही लक्ष्मी बॅंकेत जाण्याची संधी मिळाली नाही. झोपडी बागेतच रमले कारण मसोबा, मरीआई, माळावरची आई, डोंगरावरची आई, रेणुका आई, यल्लमा आई हे आमचे देव असल्यामुळे ऊर्जा खाते, अर्थ खाते, पाटबंधारे खाते कधी देवाने आमच्याकडे दिलेच नाही. म्हसोबा जागृत देव असल्यामुळे रेड्याचं, हरणाचं, कासवाचं, घोरपडीचे मटण मन संतुष्ट करणारा नैवेद्य असायचा,
सुशीलकुमारजी, बबनरावजी, खासदार बनसोडेजी, मी स्वतः लक्ष्मी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी झालो परंतु स्वर्गीय खासदाराकडे लक्ष्मी कधी थांबलीच नाही. आम्हा बाकीच्या सगळ्याकडे बॅंकेत शेअर्स वाढले. एका कारखान्याचे पाच कारखाने झाले. माझ्याकडे सूतगिरणीसह अनेक संस्था झाल्या. परंतु, खासदार थोराताकडे मात्र "आगे लकडी, पीछे लकडी, देख तमाशा लकडी का' अर्थात अशाप्रकारे जीवनातली आयुष्याची 92 वर्षे घालवली तर सोलापुरात कोर्टामध्ये 10 वर्षे प्रॅक्‍टिस केली. 35 वर्षे खासदारकी केली आणि उर्वरित आयुष्य समाजसेवा करण्यात घालवली, गरिबासाठी कल्याणाकरता बॅंक कशी काढावी, खासदार थोरात यांनी शिकवले. केंद्र सरकारच्या पैशावर जगदंबा काढली. माढेश्वरी बॅंक काढली आणि आयुष्याच्या अखेरीला कर्तबगार नेतृत्व पाच कारखान्याचे मालक बबन दादा सारख्या मजबूत भक्कम माणसाच्या हाती देऊन गेले त्यामुळे बबन दादाचे दर्शन घेत हा मातंग समाज कायमचा ऋणी राहील.