#

Advertisement

Monday, April 17, 2023, April 17, 2023 WIB
Last Updated 2023-04-17T12:30:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

ऍड. कोमलताई आणि भीमाबाईंची गळाभेट चर्चेत

Advertisement

"नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2023' सोहळ्यात आजीबाई पुरस्काराने सन्मानीत

नाशिक : "ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मंथ अँड अबॅकस' यांच्यातर्फे "नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2023' प्रदान करण्यात आले. यासोहळ्यात पंढरपूर येथील शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आणि भीमाबाई जोंधळे आजीबाईंच्या गळाभेटीची चर्चा चांगलीच नाशिक शहर तसेच जिल्ह्यात रंगली आहे. त्यांच्या या भेटून माय-लेकीच्या भेटीचे चित्र सर्वांसमोर उभे राहिल्याचे अनेकांनी सांगत ऍड. कोमलताई यांच्या या प्रेमळ गळाभेटीला भरभरून दाद दिली.
"नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2023' प्रदान करण्यात आले. यावेळी नाशिकच्या ओझर जवळील दहाव्या मैलावर "हॉटेल रिलॅक्‍स कॉर्नर' हे पुस्तकांचे हॉटेल चालविणाऱ्या 75 वर्षांच्या भीमाबाई जोंधळे यांना ऍड. कोमलताई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी पुरस्कार प्रदान करीत भीमाबाई यांची गळाभेट घेत त्यांच्या कामाचे कौतूक केले, त्यांच्या या निरागस भेटीची चर्चा या सोहळ्यात चांगली रंगली.
याबाबत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी यासाठी भीमाबाई जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करून दिलेली आहे. हे हॉटेल नव्हे तर जणू ग्रंथालय आहे. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी या अनोख्या उपक्रमाची जोड आपल्या हॉटेल व्यावसायाला दिली आहे. त्यांच्या हॉटेलला मी स्वत:ही भेट दिली आहे. भीमाबाईंच्या हॉटेलच्या भिंतीही नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात. याशिवाय हवं ते पुस्तक इथं वाचायला मिळतं. जेवणासोबत खवय्ये पुस्तकं वाचण्याचा ही भरभरून आनंद घेतात. तुम्ही बसलेल्या टेबलवर चार ते पाच पुस्तकं वेगवेगळी असतात. ती जर तुम्हाला आवडली नाहीत तर शेजारी असलेल्या अलमारीतून तुम्ही हवं ते पुस्तक घेऊ शकतात. विविध प्रकारची असंख्य पुस्तकं त्यांनी खवय्यांना उपलब्ध करून दिली आहेत. भीमाबाईंचा हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे, त्यांच्या या उपक्रमाबाबत मला मोठे समाधान वाटले. विशेष म्हणजे त्यांना पुरस्कार देता आला, यामुळे साहजीकच त्यांची गळाभेट घेऊ वाटले, असेही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.

भीमाबाईच्या हॉटेलात ही आहेत पुस्तकं...
बाळाची नाती, फिंद्री, मी आपला उगीचच, माती, सावित्री, सुविचार, सांज किरणे, जागृती, दिंडी निघणार आहे, विचार धन, लोकरंग नाट्यरंग, ज्ञानज्योती, अस्वस्थ कल्लोळ, अवर्त, भारतीय शासन राजकारण, एका गावाची गुलाबी गोष्ट, दारणाकाठच्या पाऊलखुणा, मातीची मुळाक्षरे, चंद्रकोर, तिमिर मौन, माझ्या मनाच्या अंतरी, मुगधायनी, हुंदका, कविता अंतरीच्या, शोषण यांसारखे अनेक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत.