#

Advertisement

Monday, April 17, 2023, April 17, 2023 WIB
Last Updated 2023-04-17T11:52:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

वक्तृत्वासाठी चौफेर अभ्यास असावा; काय बोलावे याचे भानही आवश्‍यक : माजी मंत्री ढोबळे

Advertisement

करकंब : विद्यार्थ्यांनी बालवयातच वक्तृत्व ही कला अवगत केली पाहिजे. यातून निश्‍चितच यश प्राप्त होते. पण ते करताना आपला प्रत्येक विषयाचा चौफेर अभ्यास असायला पाहिजे, सुरुवात, शेवट हा रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतीविषयकच बोलले पाहिजे, यांचे भान वक्त्‌यांनी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
करकंब येथील नादब्रह्म कला फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व आणि सुत्रसंचालन कार्यशाळेच्या सांगता समारंभात प्रा. ढोबळे उपस्थितांना " वक्तृत्व ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली' या विषयावर मार्गदर्शन करीत होते.
सदर व्याखानाची सुरूवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे, नितीन खाडे, डॉ. प्रशांत मोरे, सुनिल अडगळे, सतिश देशमुख, तानाजी गायकवाड, अजित देशमुख, वंदना पंत आयोजक ज्ञानेश्वर, देवकी दुधाणे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, वकृत्व करताना महत्वाचे मुद्दे मांडत असताना आत्मविश्वास पूर्वक मांडले पाहिजेत आणि त्यात सुभाषिते, संस्कृत, कविता, एखादी इंग्रजी वाक्‍य असली तर आपले वक्तृत्व अधिक प्रभावीपणे होते, अशी अनेक उदाहरणे देत ढोबळे यांनी आपल्या मधूर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या चारदिवसीय कार्यशाळेत डॉ. सचिन लादे, डॉ. मैत्रेयी केसकर, सोमनाथ गायकवाड, आकाश थिटे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन करत ही कार्यशाळा आम्हा सर्व सहभागी सदस्यांना भविष्यकाळासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार असून यातूनच वक्ते घडतील, असा स्त्युत्य उपक्रम नादब्रह्म कला फाउंडेशनचे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी राबविल्यामुळे सर्वांनी कौतुक केले. भविष्यकाळात ही सर्व करकंब व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे, देवकी दुधाणे, विशाल बोधे, विजय भागवत, देविदास काटवटे, बापू खारे, सुवर्णा टकले, श्रीराम टकले आदींनी परिश्रम घेतले.