#

Advertisement

Friday, April 21, 2023, April 21, 2023 WIB
Last Updated 2023-04-21T11:20:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे बॅनर ; पुन्हा चर्चेला उधाण

Advertisement

पुणे : मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये लागलेले पोस्टर. 
एका उत्साही कार्यकर्त्याने पिंपरी चिंचवड शहरात दादा आम्ही तुमच्यासोबत आज, उद्या आणि सदैव आसा मजकूर असलेलं होर्डिंग्ज लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आणि शरद पवार यांचा फोटो नाही. एका माजी नगरसेवकाने हे बॅनर लावल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये लावण्यात आलेले हे होर्डिंग्ज चर्चेचा विषय बनले आहेत.
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीतमध्येच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच या बातम्या मुद्दाम पेरल्या जात असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.