#

Advertisement

Friday, April 21, 2023, April 21, 2023 WIB
Last Updated 2023-04-21T11:08:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राज्यपालांकडे "विठ्ठला'च्या साक्षीने शेतकऱ्यांचे मांडले प्रश्‍न

Advertisement

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भेट घेत दिले निवेदन

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले, यात पीकपाण्याचे नुकसान संदर्भात गेली महिनाभर पंचनामे करण्याची नुसती चर्चा झाली परंतु, कामाला वेग नाही. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतचे आदेश संबंधीत यंत्रणेला द्यावेत, अशी विनंती राज्यपाल बैस यांना भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी "विठ्ठला'ला साक्ष ठेऊन केली. विठूरायाची सुंदर मूर्ती भेट देत ढोबळे यांनी राज्यपाल यांच्याकडे निवेदनही सादर केले.
माजी मंत्री ढोबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासकीय यंत्रणेस आपण तातडीच्या सूचना कराव्यात, अशी मागणी राज्यपालाकंडे माजी मंत्री प्रा. ढोबळे यांनी केली आहे. यावेळी युवा नेते अभिजीतदादा ढोबळे, उरूळीकांचनचे भाजप सदस्य राजू ओसवाल, सोलापूर भाजचे सोशल मीडिया प्रभारी संजू खिलारे उपस्थित होते.