Advertisement
बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अद्याप चर्चा थांबत नाही. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरु आहे ते नक्की होणारचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे.
माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभवरून मी हे सांगत आहे असंही प्रकाश सोळुंके म्हणाले. बीडच्या माजलगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सोळंके म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर भाजप महाराष्ट्रात काही ना काही चमत्कार करेल. त्यामुळे अजितदादांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही काहीतरी शिजत असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिले आहेत. यामुळें पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
