Advertisement
नागपुर :
देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत. तर दुसरीकडे सीएम एकनाथ
शिंदे तीन दिवस सुटीवर गेले आहेत. यामुळे नागपुरात चांगलाच राजकीय संगीत खुर्चीचा
खेळ रंगला आहे.
राज्याचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी भूषविले
आहे. 2019ला ते पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे वाटत होते. अजित पवार यांच्यासह
त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. परंतु, ते पद औटघटक्याचे ठरले.
मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे बसल्यानंतर अडीच वर्षांनंतर शिवसेनेचेच नेते एकनाथ
शिंदे यांनी बंड केल्याने सत्तांतर झाले. त्यावेळी पुन्हा मुख्यमंत्री पदावर फडणवीस
येतील असे वाटत असतानाच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार एकनाथ शिंदे हे
मुख्यमंत्री झाले. आता, पुन्हा राजकीय वावटळांत मुख्यमंत्री बदलणार आणि देवेंद्र
फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यातूनच नागपुरात असे बॅनर झळकले
आहेत.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे
कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देतांना
नागपूरच्या बॅनर प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या कोणी ते बॅनर लावले
आहेत ते त्यांनी काढून टाकावेत. अतिउत्साही लोकं असतात, तेच असे करत असल्याचेही
त्यांनी सांगितले.
