#

Advertisement

Tuesday, April 25, 2023, April 25, 2023 WIB
Last Updated 2023-04-25T18:03:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीला मिळणार मुख्यमंत्रीपद? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा

Advertisement


मुंबई :
 
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आगामी काळात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर तसा प्रस्तावच ठेवला आहे. 
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार यांनी सर्व दावे फेटाळले असले तरी चर्चा मात्र अद्याप कायम आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून शरद पवार यांच्याकडे एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये ठाकरे गटाने जर आगामी काळात महाराष्ट्रात सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात तयारी दर्शवली आहे. महाविकास आघाडी टिकावी यासाठी ठाकरे गटाकडून सुरु प्रयत्न सुरु असून त्याचाच हा एक भाग असल्याची माहिती मिळत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोर प्रस्ताव ठेवला आहे की, भलेही त्यांच्याकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व असलं तरी जर उद्या सत्ता आली तर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्यासंबंधी कोणतीही शंका नसेल. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी आपली काही हरकत नसल्याचं सांगितलं आहे. याचं कारण त्यांची प्राथमिकता पक्षाला मजबूत करणं आणि शिंदे-भाजपा यांना हरवणं आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.