#

Advertisement

Friday, April 14, 2023, April 14, 2023 WIB
Last Updated 2023-04-14T11:47:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

इंचलकरंजी येथील कार्यक्रम पत्रिकेत "बहुजन रयत परिषद'च्या नावाचा गैरवापर

Advertisement

पदाधिकारी आयोजकांना कायदेशीर नोटीस बजावणार

सोलापूर : इचलकरंजी येथे आयोजीत करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रम पत्रिकेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा संस्थापक अध्यक्ष असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांचा नामोल्लेख टाळून आयोजक तथा आपले नम्र म्हणून "बहुजन रयत परिषद'चा उल्लेख करण्यात आल्याने या घटनेचा तिव्र निषेध करीत विनापरवानगी परिषदेचे नाव वापरल्याबद्दल न्यायालयीन नोटीस बाजाविण्यात येणार असल्याचे बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. शुभा पिल्ले यांनी सांगितले.
याबाबत बहुजन रयत परिषदेची विशेष बैठक झाली. यानुसार जाहीर केलेल्या निषेध पत्रकात म्हटले आहे की, सदर सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजक म्हणून हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे हे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कार्यक्रम पत्रिकेत "बहुजन रयत परिषद' असा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, यासाठी कोणतीही पूर्वी परवानगी पदाधिकाऱ्यांकडून आयोजकांनी घेतलेली नाही. शिवाय बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे तसेच सध्याच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही. या पत्रिकेत आपले नम्र या मुद्याखाली बहुजन सामाजिक संघटना, इचलकरंजी तसेच बहुजन क्रांती दल, महाराष्ट्र राज्य असाही उल्लेख आहे. परंतु, या संस्थेशी "बहुजन रयत परिषदे'चा काहीही संबंध नसल्याचे तसेच केवळ "बहुजन' शब्दांमुळे आमच्या संस्थेच्या नावाचा उल्लेख आयोजकांनी पत्रिकेत केलेला आहे. "बहुजन रयत परिषद'ही नोंदणीकृत (रजिस्टर) संघटना आहे. संघटनेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. संघटनेचे कार्यक्षेत्र राज्यभर आहे, आगामी काळात राजकीय पक्ष म्हणून उदयास येणार आहे, त्यामुळे संघटनेचा नामोल्लेख करण्यापूर्वी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, इंचलकरंजी येथील सावर्जनिक कार्यक्रमाच्या पत्रिकेत बहुजन रयत परिषदेच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा थेट आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे कायदेशीर नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे ऍड. पिल्ले यांनी स्पष्ट केले.