#

Advertisement

Thursday, April 13, 2023, April 13, 2023 WIB
Last Updated 2023-04-13T11:28:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवार भाजपसोबत जाणार का?

Advertisement

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसने मवाळ भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे गुणगाण गायले. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही भाजपसोबत जाणार का? 
देशात भाजपविरोधात विविध राजकीय पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न होत आहे. दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील शरद पवार उपस्थित नव्हते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असे संकेत आहेत, अशी चर्चा सुरु झाली.  मात्र, भाजपसोबतच्या आघाडीवर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आता सांगता येणार नाही. महाविकास आघाडी सध्या तरी एकत्र असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. तसेच दिल्लीत झालेल्या राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होते. मात्र, मला इथे काही कामे होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.