Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे पुन्हा एकदा मुंबईमध्ये येत आहे. 16 एप्रिलला ते मुंबईत असणार आहे. अमित शहा पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहे. पुढील रविवारी महारष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा हे मुंबईत येत आहे.
अमित शहा हे मागील तीन महिन्यात अनेक वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 19 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये आले होते. त्याआधी नागपूरमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या दरम्यानही अमित शहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती.
