#

Advertisement

Wednesday, April 26, 2023, April 26, 2023 WIB
Last Updated 2023-04-26T14:40:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढ्याचं ऋण फेडण्याची संधी मिळू देत : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

"रणयुग टाइम्स' पुरस्कार सोहळ्यात थेट आमदारकीची इच्छा व्यक्‍त केल्याची तालुक्‍यात चर्चा

मंगळवेढा : भविष्यात या तालुक्‍याचे ऋण फेडण्याची संधी नक्की मिळू देत, अशी प्रार्थना संत दामाजींच्या आणि पांडुरंगाच्या चरणी करते. माझी माणसं म्हणून हक्काने मी मन मोकळं केलेले आहे. याला राजकीय वळण देण्याची गरज नाही, असे शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका तथा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
मंगळवेढा येथील रणयुग टाइम्सचा 11वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कवी, लेखक, वात्रटिकाकर भारत सातपुते यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव पुरस्कारांनी करण्यात आला. यावेळी ऍड. कोमलताई यांना क्रांती ज्योती रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जीवन गैरव प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढा भुषण राहुल शहा, कार्यरत्न अनिल सावंत, उद्योग रत्न संजय आवताडे, युवा लोकरत्न संजय जाधव, सहकाररत्न अनिल इंगवले, अस्लम चौधरी, कार्यकुशल जननायक गौंरीशंकर बुरकुल, कर्तुत्ववान नारीरत्न तेजस्विनी कदम, समाजरत्न ज्ञानेश्‍वर चव्हाण, संघर्षरत्न सुलेमान तांबोळी, बहुजनरत्न बापुासहेब मेटकरी, प्रेरणादायी उद्योजिका करूणा शिवशरण, संघटनरत्न राजेंद्र माळी, चंद्रकांत वेदपाठक, दर्पणरत्न मल्लीकार्जून देशमुख, युवा आयकॉन भुपेश घनकंदूल, शिक्षणरत्न चिदानंद माळी, लहू घगे, बालाजी लोहकरे, सुरेखा घोडके, सूरज डोके, संतोष मिसाळ या मान्यवरांनाही गौरविण्यात आले.
सन्मानार्थी ऍड. कोमलताई म्हणाल्या की, माझे आराध्य दैवत ढोबळे साहेबांमुळे माझी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही,
लोकप्रतिनिधी कामाचा असावा. तो फक्‍त नावाचा असू नये तरच विकासाची कामे उभी राहतात हे ढोबळे साहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. अशी विकासाची दृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची तालुक्‍याला खरच गरज आहे. तरच विकासाचा बॅंकलॉक भरून निघणार आहे. मला माहित आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही. पण, मला माझ्या तालुक्‍याबद्दल जी तळमळ आहे ती सांगितली. आपल्या तालुक्‍यालाही तुमच खर दुःख मनमोकळेपणाने सांगू शकता, असा आपला हक्काचा लोकप्रतिनिधी पाहिजे. सत्तेची लालसा, बडेजाव, अहंकार आणि कामाचा नुसता दिखावा असे मुखवटे घातलेला चेहरा कोणाचेही भले करू शकत नाही. तो फक्त फसवू शकतो. खरं सांगू का कर्माची चपराक सणसणीत असते. आपण जमा केलेलं पुण्य कधी संपेल हे सांगता येत नाही. कर्माने माणसाला प्रतिष्ठा मिळते आणि कर्मानेच माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळते. आभाळाला हात लावण्याच्या प्रयत्नात आपल्या पाया खालची जमीन तर सुटत चालली नाही ना, याच भान असायला हवे, असे वाटते.
मंगळवेढा ही संताची, समाजसुधारकांची, कलावंतांची कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची भूमी आहे, अशा या समृद्धभूमीमध्ये मी वाढले, घडले. संस्काररूपी रुखवत मला याच तालुक्‍यात मिळाला. दलित मित्र कदम गुरुजींसारखे आदरणीय व्यक्तिमत्वाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण याच तालुक्‍यात झाले. येथेच मी वडीलांबरोबर फिरले, माझ्या सामाजिक कार्याची सोनेरी पहाट आणि राजकीय वाटचाल बहुजन रयन परिषदेच्या माध्यमातून याच तालुक्‍यातून झाली. या तालुक्‍याने मला सोनेरी आठवणी दिल्या. माइया आई सोबतचे रुपेरी बालपण याच तालुक्‍याने दिले.त्यामुळे आपले माहेर सुख-समृद्धीने बहरलेलं असावे, असं कोणत्या सासुरवाशींना वाटणार नाही. यामुळे आपल्यासमोरा मनमोकळे केले.
आज रणयुग टाइम्स तालुक्‍याचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रम्हपुरी सारख्या एका खेड्यातून आलेल्या एक ध्येयवादी मुलाने पत्रकारितेचे व्रत घेतले. मालक, संपादक असलेले दिलीपदादा यांच्या विचारांची छाप रणयुग टाइम्स मध्ये पाहायला मिळते.
पत्रकारितेचा कोणताही वारसा नसताना प्रमोद बिनवडे यांनी वडीलांच्या सहकार्याने आणि गुरु दिगंबर भगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने पत्रकारिता क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. 20 एप्रिल 2012 रोजी साप्ताहिक रणयुग टाइम्स हे वृत्तपत्र सुरु केले आणि आपल्या झुंझार लेखणीने समाज परिवर्तनाचे कार्य केले. प्रतिक, उदाहरण, संदर्भ, म्हणी याचा वापर इतक्‍या खुबीने केलेला असतो की एखादा प्रवचनकार प्रवचन देत आहे. खंबीरपणे उभी राहणारी, जन कल्याणासाठी झटणारी माणसं असल्याने समाज सुधारला, यापैकी एक म्हणजे आपले दिलीपदादा बनवडे. खाण तशी माती या म्हणी प्रमाणे दादांच्या सात्विक विचारांच्या वाणीत दडलेलं बावनकशी सोनं म्हणजे त्यांचे सुपुत्र प्रमोददादा बिनवडे, अशा शब्दांत ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी कौतूक केले.