#

Advertisement

Tuesday, April 4, 2023, April 04, 2023 WIB
Last Updated 2023-04-04T10:35:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नेमकं फडतूस कोण.., हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित !

Advertisement

नागपूर : 'नेमकं फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मी नागपूरचा आहे त्यामुळे मला यापेक्षाही खालच्या भाषेत बोलता येतं, पण मी तसं करणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिलं. नेमकं फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मी नागपूरचा आहे त्यामुळे मला यापेक्षाही खालच्या भाषेत बोलता येतं, पण मी तसं करणार नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून कसं सरकार चालवलं संपूर्ण राज्याला माहीत आहे. सचिन वाजे सारख्या माणसाला पोलीस दलात घेऊन काय काय धंदे केले हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे माझं तोंड उघडायला लावू नका, मी जर तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल. मी तुमच्या उपकाराने राज्याचा गृहमंत्री नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि सरकार पूर्ण होईपर्यंत राहणार आहे, अशी टीका फडणवाीस यांनी केली.