#

Advertisement

Tuesday, April 18, 2023, April 18, 2023 WIB
Last Updated 2023-04-18T16:31:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवार कीर्तनात तल्लीन...

Advertisement


पुणे : देहूत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं देहूतील त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोप सोहळा. या सोहळ्याला शरद पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांनी कीर्तन सुरू होताच एकाग्रतेने ऐकत ते तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शरद पवार यांच्यावर कीर्तनकार उल्हास पाटील यांनी स्तुतीसुमने उधळत पवारांवर अभंग सादर केला. शरद पवार हे शेतकऱ्यांचे पांडुरंग असे सांगत त्यांनी पवारांचे कौतुक केले. शरद पवारांनी देखील ह्या अभंगाला दाद दिली आहे. यावेळी शरद पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं.