Advertisement
पुणे युवक अध्यक्षपदी अक्षय घोडके यांची तर पिंपरी-चिंचवड महिला आघाडी संपर्क प्रमख पदी शताब्दी फणसे यांची निवड
पिंपरी : पक्ष, संघटना याचा खरा प्राण हा कार्यकर्ताच असतो. परंतु, सध्याच्या स्वार्थी राजकारणात कार्यकर्त्यांचा वापर कढीपत्याप्रमाणे व्हायला लागला आहे. बहुजन रयत परिषद ही कार्यकर्त्यांची संघटना आहे. कार्यकर्ता मोठा व्हावा, या विचाराने परिषदेचे जुने, जाणते पदाधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे बहुजन रयत परिषदेमध्ये सहभागी होताना एका ध्येयाने आपण सर्वजण काम करीत आहोत, आपल्याला चांगली संधी मिळत आहे, त्याचे सोने करा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.पिंपरी-चिंचवड शहर बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पिंपळे गुरव येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पुणे युवक अध्यक्षपदी अक्षय घोडके यांची तसेच पिंपरी-चिंचवड महिला आघाडी संपर्क प्रमख पदी शताब्दी फणसे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना मागदर्शन करताना ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे बोलत होत्या.
पिंपळे गुरव येथे झालेल्या या कार्यकर्ता बैठकीस बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा ऍड. शुभा पिल्ले उपस्थित होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
ऍड. कोमलताई म्हणाल्या की, बहुजन रयत परिषदेचे काम राज्यभरात सुरू आहे. संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी परिषदेचे काम करताना या संघटनेची नव्याने बांधणी केली आहे. युवकांना स्थान दिले जात आहे. परिषदेचा पदाधिकारी, कार्यकर्ता शिक्षीत, उच्चशिक्षीत आहे. कुठल्याही अडचणीत संघटना मदतीला उभी राहत असल्याने संघटनेत सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. संघटना समाजहिताचे ध्येय, धोरणे ठेवून कार्यरत आहे. संघटनेला संस्कार, विचार आणि अध्यात्माचा आधार आहे. सामाजिक भान आणि कर्तव्याची जाण आहे. आजपर्यंत आपण सर्वांनी संघटनेचे काम चांगले आहे. जुने जाणते, जाणकार संघटनेचे काम करीत आहेतच परंतु, त्यांचे हात बळकट करण्याचे काम आपण युवकांनी केले पाहिजे. यासाठी एका विचाराने प्रेरित होणारे अधिकाधिक लोक एकत्र यायला हवेत, असेही ऍड. कोमलताई यांनी सांगितले.
चर्चा तर होणारच
महाराष्ट्र राज्यात दबदबा निर्माण केल्यानंतर बहुजन रयत परिषदेने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये पायाभरणी करण्यावर भर दिल्याचे पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्त अक्षय घोडके, शताब्दी फणसे यांच्या केलेली नियुक्तीनंतर स्पष्ट होत आहे. आजच्या शहर कार्यकर्ता बैठकीतील प्रचंड गर्दी हे आगामी काळात प्रस्थापितांना मोठे आव्हान ठरू शकते. पिंपरी-चिंचवड परिसरातील शेकडो कार्यकर्ते यावेळी झालेल्या बैठकीस उपस्थित असल्याने या बैठकीची चर्चा पिंपरी-चिंचवड परिसरात चांगलीच रंगली आहे.
