Advertisement
| भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे
यांचा उपक्रम सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाचे 99 भाग प्रसारित झाले आहेत. तर, या महिन्यांच्या 30 एप्रिलला 100वा भाग प्रसारित होत आहे. देशवासियांसह सोलापूरकरांना या कार्यक्रमच्या 100व्या भागाचे वेध लागले आहेत. 30 एप्रिलला प्रसारित होणारा भाग सोलापुरातील प्रत्येक घटकातील नागरिकापर्यंत पोहचावा, मोदीजींची विचार सर्वत्र पोहचावेत, या उद्देशाने शाहू शिक्षण संस्थेंच्या प्रांगणात किमान तीन हजार नागरिक एकत्रितपणे मोदीजींची मन की बात ऐकतील, असे नियोजन करण्यात येत असल्याचे माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या तयारीची बैठक ढोबळे यांनी घेतली याबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, मन की बातचा 100वा भाग 30 एप्रिलला सोलापूर जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या कार्यक्रमाचा 100वा भाग जिल्ह्यातील अधिकाधिक बूथवर प्रसारित करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठीची संपूर्ण तयारी झाली असल्याचेही ढोबळे यांनी सांगितले. | |||
