Advertisement
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे सामूहिक श्रवण उपक्रमाचे आयोजन भाजपचे प्रांतिक सदस्य, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले होते.
शाहू शिक्षण संस्था तसेच शहर, जिल्हा बुथवर मन की बातच्या १००व्या कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण आयोजन करण्याचे आवाहन ढोबळे यांनी केले होते, त्यांच्या या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला.
रविवारी ,सकाळी ११ वाजता प्रसारित झालेला पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम शिक्षक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर अशा एकूण तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित ऐकला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मार्गदर्शन केले.
सोलापुरातील प्रत्येक घटकातील नागरिकापर्यंत पंतप्रधान यांची मन की बात पोहचावी, मोदीजींचे विचार सर्वत्र पोहचावेत, या उद्देशाने मोदीजींची मन की बात सामुहिक श्रवण उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला,
शहर तसेच जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम पोहचवता आला, याचे समाधान आहे, सर्व शिक्षक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामुळे हे शक्य झाले, असे ही माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.

