Advertisement
ठाणे : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्यालाला मारहाण केल्याची घटना समोर आली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणामुळे आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
शिवसेना फुटीला अनेक महिने उलटून गेले असले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे. कार्यकर्तेही एकमेकांविरुद्ध आक्रमक असलेले पाहायला मिळत आहे. त्यातूनच ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्यालाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना, ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल आहे.
