#

Advertisement

Tuesday, May 2, 2023, May 02, 2023 WIB
Last Updated 2023-05-02T11:15:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार "राष्ट्रवादी"च्या अध्यक्षपदावरुन निवृत्त ?

Advertisement

पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. नवी जबाबदारी नको. नवा अध्यक्ष कोण हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावं.

मुंबई : 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. कुठे थांबायचं हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.यावेळी शरद पवार म्हणाले की,  1967 साली पासुन माझा राजकीय प्रवास सुरु झाला. महाराष्ट्राच्या जनतेने मला पराभवाचा रस्ता कधी ही दाखविला नाही. कुठे थांबायचं हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार आहे. राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. नवी जबाबदारी नको. नवा अध्यक्ष कोण हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावं, असंही ते यावेळी म्हणाले. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चेला उधाण आलं आहे. मात्र अद्यापही कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.