#

Advertisement

Friday, May 19, 2023, May 19, 2023 WIB
Last Updated 2023-05-19T16:51:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

Advertisement

मुंबई : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्यामध्ये मंत्रिंमंडळ विस्ताराला परवानगी मिळा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार हा 23 किंवा 24 मेला होण्याची शक्यता आहे. 
मंत्रिपदासाठी शिंदे गट, भाजपमधील काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये  भरत गोगवले ( जलसंधारण),  संजय शिरसाठ ( परिवहन किंवा समाजीक न्याय मंत्री ),  प्रताप सरनाईक( गृहनिर्माण मंत्रालय ) ,  बच्चू कडू (दिव्यांग विकास मंत्री),  सदा सरवणकर,  यामिनी जाधव,  अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयानं अपात्रेसंदर्भात निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे.