#

Advertisement

Wednesday, May 10, 2023, May 10, 2023 WIB
Last Updated 2023-05-10T11:37:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्यभरात प्रा. ढोबळे यांच्या वाढदिनी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Advertisement

सोलापूर : माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.18 मे) विविध समाजोपयोगी, धार्मिक तसेच मनोरंजन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी महिती बहुजन रयत परिषेदेचे ईश्‍वर क्षिरसागर यांनी दिली.
राज्यभरातील बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माजी मंत्री ढोबळे यांच्या वाढदिनी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, रक्‍तदान शिबिर आदींचा समावेश आहे. याशिवाय चोखामेळा चौक येथे बुधवारी (ता.17) सायंकाळी वास इस दास हा मनोरंजनात्मक कार्यक्रम, कवी संमेलन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा तसेच तालुका पातळीवर राज्यभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजापयोगी कार्यक्रमांवरच भर द्यावा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या महिला अध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.